Ad will apear here
Next
लाभदायी वास्तुरचना
छोट्यामोठ्या समस्यांनी त्रासलेल्या किंवा मनःशांतीच्या शोधात असणाऱ्या लोकांना जर कुणी सांगितलं, की मनःशांतीबरोबरच कौटुंबिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा एक सोपा उपाय आपल्याच वास्तूत दडलेला आहे, तर अशी माणसं नक्कीच तो उपाय करून पाहायला तयार होतात. अशांसाठीच पंडित रमेश पलंगे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा पलंगे यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘लाभदायी वास्तुरचना’ या पुस्तकाचा परिचय...
.........................
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात सामान्य माणसाला अनेक समस्यांनी ग्रासलेले असते. त्यातच चहूबाजूंनी सर्व प्रकारच्या माध्यमांतून नकारात्मक बातम्या आणि घडामोडींचा भडिमार होत असतो. त्यामुळे साहजिकच मग सामान्य माणूस जिथे कुठे थोडीफार सकारात्मक ऊर्जा मिळेल अशा ठिकाणांच्या शोधात असतो. कुणी एखाद्या स्वामी किंवा बुवांच्या भजनी लागतात...कुणी नित्यनेमाने जवळच्या देवळात जाणे सुरू करतात, तर कुणी नामस्मरण किंवा जपाचा अवलंब करू पाहतात. अशा त्रासलेल्या किंवा मनःशांतीच्या शोधात असणाऱ्या लोकांना जर कुणी सांगितलं, की मनःशांतीबरोबरच कौटुंबिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा एक सोपा उपाय आपल्याच वास्तूत दडलेला आहे, तर अशी माणसं नक्कीच तो उपाय करून पाहायला तयार होतात. आणि अशांसाठीच पंडित रमेश पलंगे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा पलंगे यांनी घराची, कामाच्या ठिकाणच्या ऑफिसची, दुकानाची, कारखान्याची रचना वास्तुशास्त्राच्या आधारे बदलल्यास मिळणारे फायदे अतिशय सुलभ शब्दांत एका छोटेखानी पुस्तकाच्या रूपाने समोर आणले आहेत. ते वाचून आणि त्यात दिल्यानुसार आपल्या वास्तूत सर्व बदल केल्यास, नकारात्मक वातावरणामुळे वैतागलेला सामान्य माणूस एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेची अनुभूती घेऊ शकेल असे हे पुस्तक वाचून वाटते.

वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय असते? आपण शाळेपासून ते कॉलेजपर्यंत अनेक प्रकारची शास्त्रे शिकलेली असतात; पण कधीही ह्या शास्त्राविषयी ऐकलेले नसते; पण हे शास्त्र आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपासून ज्ञात होते. निसर्गनियमांचा आणि पंचमहाभूतांचा अभ्यास करून, पृथ्वीचे भ्रमण, चुंबकीय तत्त्व वगैरे गोष्टींचा अभ्यास करून वास्तुरचनेसंबंधी काही नियम आणि निकष ठरवले गेले आहेत. त्या नियमावलीला ‘वास्तुशास्त्र’ असे म्हटले जाते.

प्रस्तुत पुस्तक लिहिण्याआधी पंडित पलंगे यांनी काही घरगुती बांधकामांचा अनुभव घेतला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की वास्तूचा आराखडा बनवताना वास्तुशास्त्राचे काही ठोकताळे पाळले तर अधिक फायदे होतात, त्रास कमी होतो, मनःस्ताप कमी होतात आणि म्हणून त्यांनी वास्तुशास्त्राचा रीतसर अभ्यास सुरू केला. भारतीय स्थापत्यकला, वेगवेगळे धर्मग्रंथ अभ्यासले, अनेक ऐतिहासिक वास्तूंना भेटी दिल्या, नकाशे, आराखडे तपासले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की हजारो वर्षांपासून त्या काळातल्या नगररचनाकारांनी, शिल्पकारांनी या शास्त्राचा वापर केल्याने त्या वेळी बांधलेली शिल्पे, मंदिरे, वास्तू, इमारती आजही इतक्या दिमाखात उभ्या आहेत आणि तिथे गेल्यावर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. ‘त्या काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे,’ हे त्यावरूनच आले असावे. तात्पर्य हेच, की वास्तुशास्त्राला धरून आणि निसर्गनियमाप्रमाणे रचना केल्यास संपूर्ण विश्वातील सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि साहजिकच त्यायोगे प्रगती होत राहते.

सामान्य माणूस जमा केलेले लाखो रुपये खर्च करून, प्रसंगी कर्ज काढून स्वतःसाठी आणि पुढल्या पिढीसाठी वास्तू खरेदी करत असतो, ती लाभदायी, यशदायी, आनंददायी ठरावी अशी त्याची अपेक्षा असणे अगदी साहजिकच. त्यामुळे वास्तू खरेदी करतानाच किंवा बांधून घेत असतानाच काही नियम पाळले आणि काळजीपूर्वक अंमलबजावणी केली तर फायदा होणार हे नक्कीच!


पंडित पलंगे यांनी आपल्या अंगभूत रुची आणि या विषयातल्या प्रावीण्याचा वापर करून कोणत्याही वाचकाला समजायला आणि अंमलात आणायला सुलभ असे हे पुस्तक तयार केले आहे. आणि त्यात त्यांच्या पत्नीचेही अमूल्य सहकार्य त्यांना लाभले आहे.

वास्तुशास्त्र म्हणजे काय? त्याचा आवाका आणि व्याप्ती किती आहे? वास्तू कशी निवडावी? वास्तुदोष म्हणजे काय? वास्तुपरीक्षण कोणी आणि का करावे? वास्तूच्या बांधणीत दिशा आणि उपदिशांचे महत्त्व काय असते? प्लॉट कसा निवडावा? त्या बाजूचा रस्ता, कुंपण, भिंती इथपासून ते घराच्या आतली रचना कशी करावी, अशा सर्व प्रश्नांची अत्यंत सोप्या भाषेत उकल हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. केवळ घरच नव्हे, तर शेती, हॉस्पिटल, बँक, शैक्षणिक संस्था, मंदिरे, नाट्यगृह, क्लब हाउस, मंगल कार्यालय, मोठ्या कॉलनीज, सोसायट्या, दुकाने, आइस्क्रीम पार्लर, मेडिकल स्टोअर, ज्वेलरी दुकान, भाज्यांचे दुकान अशा विविध प्रकारच्या वास्तूंसंबंधीची तपशीलवार माहिती या पुस्तकात दिली आहे.

या पुस्तकाबरोबरच त्यांनी ‘वास्तुशास्त्र : शंका समाधान’ आणि ‘वास्तुविषयक २५० सल्ले’ अशी दोन छोटेखानी पुस्तकेही लिहिली आहेत. ही तीनही पुस्तके अनमोल प्रकाशनने प्रसिद्ध केली आहेत. आपल्या वास्तूची वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य निवड करून, सकारात्मक ऊर्जा मिळवून आपले जीवन सुखी करण्यासाठी वाचकांनी पलंगे दाम्पत्याने लिहिलेली ही पुस्तके जरूर वाचून अनुभव घ्यायला हरकत नाही.
.....

पुस्तक : लाभदायी वास्तुरचना
संपर्क : पंडित रमेश पलंगे आणि सुषमा पलंगे
फोन : ९९२२४ ४४९११ आणि ९९२२४ ४४९१२
प्रकाशक : मा. द. नांदुरकर, अनमोल प्रकाशन, ६८३, बुधवार पेठ, पुणे - ४११००२
मूल्य : २४० रुपये
पुस्तक : वास्तुशास्त्र : शंका समाधान
मूल्य : १२० रुपये
पुस्तक : वास्तुविषयक २५० सल्ले
मूल्य : १५ रुपये

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZBEBF
Similar Posts
‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’ ‘माध्यमं आणि सोशल मीडियात नकारात्मकतेचं प्रमाण अधिक असलं, तरी आपल्याला भेटणारी बहुतांश माणसं आणि येणारे अनेक अनुभव सकारात्मकच असतात. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं,’ असं सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका, प्रवासवर्णनकार आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांना वाटतं
जलसा-ए-साहीर : एक विलक्षण अनुभूती!! पुणे : खचाखच भरलेले भरत नाट्यगृह. तिसरी घंटा होते. बंद पडद्याआडून आनंद देशमुखांचा, उपस्थित रसिकांचे स्वागत करणारा सुपरिचित आवाज कानावर येतो.... आणि पाठोपाठ ‘अल्ला तेरो नाम..’ व्हायोलीनच्या सुरावटीवर ऐकू येऊ लागते. प्रेक्षक सावरून बसतात. पडदा उघडतो. आणि मग पुढचे दोन-सव्वादोन तास, व्हायोलीनवादकांच्या अद्भुत
‘तो काळच मंतरलेला होता...!’ मराठी चित्र-नाट्य सृष्टीतले बुजुर्ग कलाकार आणि ‘जागर’सारख्या संस्थेशी प्रारंभापासून निगडित असलेले आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे माधव वझे. बालगंधर्व रंगमंदिरसारख्या देखण्या वास्तूच्या उभारणीसाठी जी समिती काम करत होती, त्या समितीत पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य वझे यांना लाभले आहे. त्यांच्याकडे
‘नाटकाचं ओपनिंग करायचं, तर बालगंधर्व रंगमंदिरातच’ भालचंद्र पानसे ऊर्फ अण्णा हे पुण्यातले एक ज्येष्ठ नाट्यनिर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार!! १९६८ सालापासूनच बालगंधर्व रंगमंदिराशी कायम संबंध असलेले हे बुजुर्ग व्यक्तिमत्त्व. ‘नाटकाचं ओपनिंग करायचं, तर ते ‘गंधर्व’मध्येच,’ अशी बहुसंख्य पुणेकर रंगकर्मींप्रमाणेच अण्णांचीही भावना आहे! ..................

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language